पुणे येथील खेड तालुक्यातील भामाळ व भोरगिरी या सह्याद्रीच्या डोंगराच्या सीमेवर ‘पाब’ या गावी श्री रामजी मराडे यांच्या पोटी सत्तू मराडे चा जन्म 1885 साली झाला. सत्तू हा फायनल पर्यन्त शिकलेला होता. लहान पना पासून आध्यात्म कड़े ओढ़ असलेला हा रांगडा गडी कट्टर शंकरभक्त होता.
सत्तू तबेतीन कमी उंचीचा गडी, निमगोरा आणि करारी स्वभावाचा त्याची छाती वाघा सारखी बेडर होती. अंगात चित्या सारखी चपळाई होती. भांबुर्दा गावच्या तालमित तो घोळला होता. पुण्याच्या प्रसिद्ध पहिलवान धोंडिबा गवळी व विट्ठल सोनार यांच्या मार्गदर्शना खाली. त्यानं कुस्तीचे धड़े घेतले. यात्रेच्या अनेक आखाड्यात त्यानं कुस्ती मारून नावलौकिक मिळवला होता.
आजानुबाहु सीतारामबापू हे त्याचे गुरु होते. एकदा या सीतारामबापू यांच्या कीर्तनात तो रंगला होता. कीर्तन संपल्यावर तो तेथेच झोपला त्याला झोपेत नागराजा च्या रुपाने भगवान शंकरानी दर्शन दिल. "सत्तू आदिवासीची शिवशक्ति निर्माण कर, कलियुगातील सावकाररूपी राक्षसाचा तू समाचार घे” सावकराकडुंन होणाऱ्या अन्याय अत्याचार पाहुन तो कळवळायचा. या स्वप्नामुळे सत्तू च्या मनात ठिनगी पेटली. तो पेंटून उठला. महादेव कोळयाच्या वाड्या-वस्त्या त्याने झोड़पुन काढल्या त्यातून रुंद छातीच्या आणि बुरुजा सारखी बाहु असणाऱ्या तरुणांची मने सावकारशाही विरोधात पेटवली. जिवाला जिव देणारी टोळी त्याने तैयार केली. बंदूका,काडतुस त्यांन जमवली. ”हर हर महादेव” अशी गर्जना करत त्यानं सावकार शाही विरोधात दंड थोपटून बंड पुकारल.
मारुती पेवजी आढळ, गोविंदराव सुपा, दगडू गोपाळ शिंदे, काशीबा बूढ़े, या सारख्या माणसांची चिरेबंद फ़ौज़ त्यानी तयार केली. जे आदिवासी झोपले होते ते जागी केले, जे जागी होते ते चालते केले, जे चालते होते ते पळते केले, जे पळते होते ते पेटते केले आणि असा पेटता निखारा सोडला सावकारावर.
सत्तू अत्यंत धार्मिक प्रवृत्तिचा माणूस. रात्रीचे छुपे दरोडे आणि गोळीबार करने हे त्याच्या तत्वात बसत नव्हतं. आया बहिनी ना त्याने कधी त्रास दिला नाही. गळ्यात काडतुसाचा पट्टा, खांद्यावर बंदूक आणि कमरेला तलवार लटकवुन दिवसाधवळ्या सारकराच्या घरी बेधड़क जायचा. पैसे-कपड़ालता घ्यायचा गोर गरीबाना वाटायचा. भिंतींन गांगरलेले सावकार हजार बारशे रु. काढून द्यायच देताना ते वरवर ख़ुशी दाखवायचे आणि आतून अत्यंत जळफळत होते. पण काय करणार शेवटी तो आदिवासीचाच पैसा होता.
एकदा फितूरीमूळ सतू मराडे पकडला गेला. आणि मुरबाड जवळील टोकावड्याच्या लॉकअप मधे ठेवला. परंतु दुर्दैव पोलिसांच हां रांगडा गडी बुद्धीच्या जोरावर पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाला तो नाशिक-ठाणे-रत्नागिरी-कोल्हापुर-कराड-सातारा असा फिरत फिरत क्रांतिसिंह नाना पाटला ला जावुन सामिल झाला. पण तिथ मन रमेना म्हणून ते पुन्हा आम्बेगाव खेड ह्या आपल्या भागात आला. पुन्हा मल्लविद्येची उपासना करुण ढासळलेली शरीरप्रकृति उत्तम बनवली.
पोलिस त्याला अटक करायला घाबरत. त्यामुळे सत्तू निर्भय पने हिंडत असे.
एक इंग्रज अधिकारी त्याला पकडायला भीमाशंकर च्या फारेस्ट बंगल्यावर राहायला आला. याची खबर गोविंदरावना कळताच त्यानी टेकड़ीवरच्या बंगल्याच्या दिशेनं एक गोळी हानली. गोळीच्या आवाजान डी एस पी, फ़ौजदार, पोलिस भयंकर घाबरले. सत्तू रात्रितून येवून आपले मुडदे पाडल या भीतीने सर्वांनी आपल बाड-बिस्तार गुंडाळला आणि निघुन गेले.
सत्तू नेहमी सांगायचा वाघ हां जंगलाचा राखनदार आहे. त्याला कधी मारू नका. हा प्राणी संपला की जंगलही संपले. सूर्य या विश्वाची प्राणशक्ति आहे. आरण्यातील वृक्ष धरतीच सळसळत ह्रदय आहे. म्हणून निसर्गचक्र अव्यातपने फिरत आहे. जंगल संपली तर प्रत्येक प्राणी मात्राच जीवन धोक्यात येईल.
जंगलातील वास्तव्यात अनेक वाघ सत्तू ला भेटायचे पण सत्तू न कधी त्याला दुखावल नाही. अन त्यानं ही कधी याची वाट आडवली नाही. सतू जंगलातील कपारित व अनंत आकाशाच्या खाली झोपयाचा. त्या वेळी वाघ त्याच्या उशाला येवून बसायचे, पण वाघान कधी सत्तू ला त्रास दिला नाही.
सत्तू आणि त्याचे सहा साथीदार एकदा भीमाशंकर च्या गडावर झोपेल होते. एक साथीदार टेहळनी करत होता. त्याची नजर एका निसरदया खड़कावर स्तिरावली. दोरावरुण चढणारे पोलिस त्याच्या सूक्ष्म नजरेने टिपले. तो धावत सत्तू कड़ गेला. परंतु सत्तू विचलित झाला नहीं. साथीदार बंदुकात काडतुस घालून तैयार होते. परंतु जीवावर बेतल्याशिवाय खून खराबा करायचा नाही असा त्याचा नियम. अत्याचारी आमीनशेठ शिवाय त्यानी कोनावर बंदूक चलावली नाही. या वेळी त्यानी मधमाशा च्या आग्यामोहळाच्या मदतींन पोलिसांना धड़ा शिकवला.
बरेच वर्ष हां क्रांतिचा लढा चालु राहिला होता.
सततच्या धावपळीन सत्तू थकला होता. सत्तू ला आता भक्ति मार्ग स्विकारुन चांगल जगायच होत. पण पोलिस त्याच्या माघ हात धुवून लागले होत. लपत छपत बायको पोराना भेटून रानावनात फरार व्हायचा. आदिवासी वरील आत्याचाराला आळा बसला. सावकाराच्या दड़पशाहिला आळा घालून प्रत्येक आदिवासी गळ्यातला टाईद बनला. पर स्त्री ला माते सामान वागणूक दिली. सत्तू च्या जीवाच्या रक्षणा साठी प्रत्येक आदिवासी आपल्या जीवाच रान करी. लायसन वाले बंदूकधारी आपल्या लायसन वर त्याला काडतुस मिळवून देत. त्याबदल्यात तो त्याना पैसे देई.
पण पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ति झाली. फितूर कामास आले. 1943 च्या वडगाव मावळ जवळील चकमकीत सत्तू च्या डाव्या पायाला गोळी लागून शीर तुटली. दोन पायाचा वाघ जायबंदी झाला. तो पकडला गेल्याची बातमी गावागावात आणि वस्ती वस्ती वर पोहचली. या बातमीन प्रत्येक आदिवासी खिन्न झाला. महादेव कोळी संतप्त झाले. आदिवासी चा आधारस्तंभ कोसळून पडला.
त्याला 10 वर्षाची शिक्षा झाली. त्यापैकी 5 वर्षाची माफ़ झाली. 1950 मधून तो पुण्याच्या येरवडा जेल मधून सुटला. खर तर 1947 चा देश स्वतंत्र झाल्यावरच त्याची सन्मानान सुटका व्हायला हवी होती. परंतु तो होता गरीब ‘आदिवासी महादेव कोळी’ वैयक्तिक स्वार्थ साठी अनेक दरोडेखोर आज स्वतंत्र सैनिकाच्या मानधनाचे मानकरी ठरले. आणि सत्तू मराडी हा मृत्यु च्या अखेरच्या श्वासा पर्यन्त दारिद्र्यात दिवस काढले.
अखेर 26 आँक्टोबर 1990 साली काळाने त्यांच्यावर झड़प घातली वयाच्या 105 व्या वर्षी सर्व घरादाराला आदिवासी समाजाला दुःख सागरात लोटून अनंतात विलीन झाला.
अशा या अद्वितीय व्यक्तिमत्वाच्या आदिवासी क्रांतिकारकाला मानाचा हुल जोहार 💐💐
संकलन : सुशिल म. कुवर
-----------------------------------------------------------
फोटो प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता